Header Ads Widget

Gen Zचा गदारोळ: प्रश्न विचारतोय, उत्तर कोण देणार? EDITORIAL

 

"Gen Z तरुणरस्त्यावर आंदोलन करताना,  प्रश्न विचारत प्लॅकार्ड हातात धरलेले – आवाज दाबण्यापूर्ण चित्र"
Gen Z तरुणरस्त्यावर आंदोलन करताना

Gen Zचा गदारोळ: प्रश्न विचारतोय, उत्तर कोण देणार?

Gen Z ही पिढी फक्त इन्स्टाग्राम स्टोरीज आणि रील्सपुरती मर्यादित नाही. ही तरुणाई, जन्मलेली १९९७ ते २०१२ या काळात. आता रस्त्यांवर उतरलीय. महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचा खर्च, मानसिक आरोग्य याबाबत प्रश्न विचारत आहे. पण ऐकायला कोणी तयार आहे का? नाही ना! सरकार बोलतंय 'विकास', राजकारणी 'युवा सक्षमीकरण', पण प्रत्यक्षात नोकऱ्या किंवा रोजगार कुठे आहे ? स्टार्टअप संस्कृतीचा गाजावाजा करत तरुणाईला ‘स्वावलंबी’ असल्याचा आभास दिला जातो, आणि तरीही नोकऱ्या, स्थिर रोजगार आणि भविष्याची खात्री आजही अस्पष्टच आहे.

Gen Z ही पहिली पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटलमध्ये वाढली. त्यांच्या हाती मोबाईल आणि डोक्यात प्रश्नच प्रश्न. क्लायमेट चेंजपासून ते CAA-NRC पर्यंत, ते आवाज देतायत. पण जेव्हा ते रस्त्यावर उतरतात तेव्हा 'अराजकता' म्हणून ब्रँडेड केलं जातं.  2020 च्या शेतकरी आंदोलनात Gen Z ने सोशल मीडियावर जगभर लाईव्ह केलं. तर  2024 च्या निवडणुकांत त्यांनी सक्रिय मतदान केलं, पण आता 2026 ला पुन्हा प्रश्न विचारत आहेत. 'आम्हाला भविष्य कुठे आहे?' जुनी पिढी, जी 9 ते 5 च्या नोकरीत रमलीय, ती समजू शकत नाही. त्यांना वाटतं, 'आम्ही तर झुगार दिला, तुम्ही काय हरवलं?'

न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा

आवाज दाबण्याचा प्रयत्न, पण असंतोष वाढतोय

वास्तव हे आहे – Gen Z ला फक्त ऐकायचं नाही, न्याय हवा. महाराष्ट्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये फी वाढवली म्हणून रस्ता रोखला. बिहारात शिक्षण घोटाळ्यावर आंदोलन. हे 'अनुशासनहीन' नाही, हे जागृत आहे. याबाबी व्यवस्थापनाच्या प्रयत्नांनी दाबता येत नाही. ही पिढी #FridaysForFuture सारख्या चळवळींनी शिकलीय. ती ऐकत नाही फक्त, ती बदल आणते. प्रश्न आहे – आम्ही ऐकू का, की पुन्हा 'टोळी' म्हणून नाव ठेवू?


अनुभव विरुद्ध वास्तव: पिढ्यांमधील दरी वाढतेय?

बूमर्स आणि मिलेनियल्स, तुम्ही म्हणता 'आम्हीही संघर्ष केला'. हो, केला. पण आजचा संघर्ष वेगळा आहे. तुमचं वेळी नोकरी मिळायची, आज UPSC मध्ये लाखो भरतायत एका जागेसाठी. तुमचं वेळी घर स्वस्त होतं, आज EMI ची सोडाच, भाडेही अव्वाच्या सव्वा Gen Z ला हवंय मानसिक आरोग्य, वर्क-लाईफ बॅलन्स, आणि खरं तर – सन्मान. तुम्ही बोलता 'स्किल इंडिया', पण स्किल शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूट्समध्येही भ्रष्टाचार. ऐका त्यांना! अन्यथा पुढील निवडणुकांत हेच मतदार निर्णायक ठरू शकतात.

डिजिटल क्रांतीतून रस्त्यावर उतरणारी तरुणाई

जुनी पिढी आणि आजची पिढी यांच्यातील अनुभव आणि अपेक्षांमध्ये फरक स्पष्ट आहे — रोजगार सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य आणि घराचे आर्थिक ओझे याबद्दल वेगळे अनुभव. Gen Z ही पहिली पिढी आहे जी डिजिटल जन्मली. त्यांचं हत्यार सोशल मीडिया. #GenZRevolt, #MaharashtraYouthCry सारख्या हॅशटॅग्सने ते ट्रेंड करतायत. पण हा डिजिटल गदारोळ रस्त्यावर येणारच. कारण प्रश्न वास्तविक आहेत.  कारण हा केवळ असंतोष नाही, तर व्यवस्थेविरुद्धचा इशारा आहे. काही अभ्यासांनुसार, देशातील सुमारे 40–45 टक्के तरुण बेरोजगारीच्या छायेत आहेत, तर मोठ्या प्रमाणावर तरुण मानसिक तणावाशी झुंज देत आहेत. सरकारला हवंय सायलन्ट जनरेशन, पण Gen Z सायलन्ट नाही. ऐकायला तयार आहात का?  त्यामुळ Gen Z रस्त्यावर उतरत आहेत. 

अमेरिकेची दादागिरी का? भारतावर परिणाम काय ? अवश्य वाचा

Gen Z चा आवाज दाबण्याचा मोह राज्यकर्त्यांनी आणि समाजाने टाळायला हवा. कारण हा केवळ बंडखोरीचा आवाज नाही, तर भविष्याचा इशारा आहे. प्रश्न ऐकले नाहीत, तर ते रस्त्यावर ऐकू येतील. हे स्पष्ट आहे की सर्वच Gen Z रस्त्यावर नाही; पण जे उतरतात, ते उगाच  उतरलेले नाहीत. आज संवादाची वेळ आहे.  आज संवादाची वेळ आहे. ज्यांचे प्रश्न आहेत, त्यांचं ऐकणं आणि उत्तर देणं हाच न्याय आहे. तसे न केल्यास असंतोषाची लहर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

याबाबत आपल्याला काय वाटतं ? जरूर कमेंट्समध्ये मत मांडा. कारण आपलं मतही अमूल्य आहे.

आमच्या NEWS VALLEY MARATHI या ब्लॉगला, फेसबुक पेज आणि यूट्युबला जरूर भेट द्या. फॉलो करा आणि लाईकही करा. धन्यवाद

#Editorial View #Youth & Society #Gen Z India #GenZRevolt #प्रश्नविचारतोय #YouthVoice #MaharashtraYouth #GenZIndia #बेरोजगारीक्रांती #DigitalYouthPower #ऐकायलातयार #GenZगदारोळ

#EditorialView #GenZIndia #YouthVoice #IndianYouth 

#Berojgari #DigitalYouth #MaharashtraYouth #GenZRevolt




Post a Comment

0 Comments