![]() |
| नाटे शाळेत पोषण आहार तांदूळ चोरी प्रकरणावर पालकांचा संताप |
नाटे शाळेतील पोषण आहार तांदूळ चोरी प्रकरण : शिक्षक निलंबन रखडल्याने पालक आक्रमक, शाळा बंद आंदोलन
राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिरात पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरणाने शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढवली आहे. मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश होऊनही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी थेट शाळा बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
चोरी कशी उघडकीस आली?
राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरण उघडकीस आले त्यामुळे मुख्याध्यापक आणि उपशिक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्ष कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर पालक आणि ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे.
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा
पोलीस गुन्हा दाखल केला का?
नाटेनगर विद्यालयाच्या गोदामातून 5 नोव्हेंबरला मध्यरात्री सुमारे दीड वाजता पोषण आहारासाठीचा तांदूळ चोरून नेणारे वाहन काही नागरिकांनी अडवले व नाटे पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी ग्रामस्थ मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून वाहनचालक कुणाल थळेश्री आणि सुनील वसंत डुगीलकर यांच्यासह शाळेचे सहायक शिक्षक नाना बीरा करे आणि मुख्याध्यापक रवींद्र जाधव यांच्या विरोधात नाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
महाराष्ट्रातील राजकारणात काय घडतंय ? अवश्य वाचा
पालकांचे आंदोलन आणि परिणाम
शासकीय पोषण आहारातील तांदुळ चोरी प्रकरण आणि अनियमितता प्रकरणी संबंधित शिक्षकांचे निलंबन करून चौकशी समिती नेमण्यात यावी अशी पालक आणि ग्रामस्थांची मागणी आहे. तसंच शाळा बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण ?
नाटे येथील शाळेतील पोषण आहार तांदूळ चोरी प्रकरण गंभीर व संतापजनक आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांवर गुन्हा दाखल होऊनही निलंबन रखडल्याने पालक आक्रमक झाले आहेत. शाळा बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
प्रश्न असा आहे - दोषींवर कारवाई कधी होणार? तुम्हाला काय वाटतं ? तुमच्या गावात असेच काही घटना झाल्या का? येथे comment करा किंवा आम्हाला इथे संपर्क करा.
#NateNews #Rajapur #SchoolRiceScam #MidDayMeal #LocalNews #NewsValleyMarathi


0 Comments