![]() |
| पुढील 10 वर्षात गडचिरोली पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये असेल-फडणवीस |
-
गडचिरोली, (जिमाका) : गेल्या काही वर्षांत गडचिरोली पोलिस दलाने दाखवलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भीती नव्हे, तर विकास, जनता आणि संविधानाची राजवट आहे. या परिवर्तनाचे साक्षीदार म्हणून गडचिरोली महोत्सव सुरू झाला आहे आणि तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिव्यक्ती आणि सहभागाचे योग्य व्यासपीठ बनला आहे. कला, खेळ, जनजागृती, नृत्य, गायन आणि मनोरंजनाद्वारे समाजजागृती आणि सांस्कृतिक एकता साधली जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- दक्षिण भारताचे प्रवेशद्वार बनेल गडचिरोली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली पोलिस विभागाच्या पुढाकाराने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम गडचिरोली महोत्सवात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अर्थ, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आशिष जयस्वाल; गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर; विशेष पोलीस महानिरीक्षक (विशेष कृती) चेरिंग डोर्जे; विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी कारवाई) संदीप पाटील; जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा; पोलीस अधीक्षक नीलोत्पल; आमदार धर्मरावबाबा आत्राम; आमदार डॉ. मिलिंद नारोटे; गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तसेच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमानियम प्रभाकरन उपस्थित होते.
- गडचिरोली महोत्सवात फडणवीसांचे प्रेरणादायी भाषण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकीकडे गडचिरोली पोलिस दलाने माओवादाविरुद्ध निर्णायक लढा दिला आणि जिल्ह्यातून त्याला जवळजवळ पूर्णपणे मुक्त केले आहे, तर दुसरीकडे जनकेंद्रित प्रयत्न आणि महसूल प्रशासनाच्या समन्वयाने राज्य सरकारच्या विविध योजनांना जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत पोहोचवले आहे.
- नक्षलवादावर निर्णायक विजय, विकासाची नवी पहाट
“आज गडचिरोली जिल्ह्यात मोठी झेप घेतली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, पर्यावरण अशा प्रत्येक क्षेत्रात जिल्हा झपाट्याने प्रगती करत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोली महाराष्ट्रातील टॉप पाच जिल्ह्यांमध्ये असेल, असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी व्यक्त केले. तसेच, येणाऱ्या काळात गडचिरोलीला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असेही त्यांनी म्हटले

0 Comments